ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोणापाल माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोणापाल माऊली मंदिरात नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 14 Oct 2023 02:58 PM
वाचन संख्या 155

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना होईल. सायंकाळी ७ वाजता सत्संगाचा कार्यक्रम होईल. सोमवार १६ रोजी सायंकाळी ७ वा. स्थानिकांची भजने तर मंगळवार १७ रोजी निमंत्रितांची भजने होतील. बुधवार १८ रोजी रात्री ८ वा. विघ्नहर्ता दशावतार नाट्यमंडळ निगुडे यांचा नाट्यप्रयोग होईल. गुरुवारी १९ रोजी रात्री ८ वा. जादुगार केतन कुमार यांचे जादूचे प्रयोग होतील. शुक्रवार २० रोजी रात्री ८ वा. ‘जुगलबंदी हरिनामाची’ कार्यक्रम अंतर्गत बुवा रुपेंद्र परब व अमित तांबुळकर यांच्यात जुगलबंदी होईल. शनिवार २१ रोजी रात्री ८ वा. श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल. रविवार २२ रोजी रात्री ८ वा. स्वामी दयासागर छात्रालयातील विद्यार्थी व स्थानिक कलाकारांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम होतील. सोमवार २३ रोजी रात्री ८ वा. महिलांसाठी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनीस्टर कार्यक्रम होईल. तीन विजेत्या स्पर्धकांना प्रशांत गावडे पुरस्कृत आकर्षक पैठणी व सुदिन गावडे पुरस्कृत सन्मानचिन्ह दिले जाईल. सोमवार २४ रोजी दुपारी २ वा. पावणी, देवलग्न व दसरोत्सव साजरा होईल. दररोज दुपारी १ वाजता महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स