ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महामार्गावर अपघातात भीषण अपघात १२ ठार व १८ जखमी ; रात्री १: ३० वाजता घडला अपघात.

महामार्गावर अपघातात भीषण अपघात १२ ठार व १८ जखमी ; रात्री १: ३० वाजता घडला अपघात.

प्रकाशन: 15 Oct 2023 08:27 AM
वाचन संख्या 420

मृतांचा आकडा वाढण्याची भीती .

मुंबई | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूर येथे दोन वाहनांच्या धडकेत १२ जण ठार तर १८ जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समृद्धी महामार्गावर जांबरगांव टोलनाक्यासमोर पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नाशिक शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते, असे सांगण्यात आले. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या घटनेत ट्रॅव्हलरमध्ये बसलेले १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांच्या आकड्यात वाढ होऊ शकते अशी भीती सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स