मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचे शिरवंडेतील तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भरीव यश ; कु. निधी चंदन कांबळी, कु. वेदांत कुर्ले आणि कु. ब्रायन फर्नांडिस यांची अव्वल कामगिरी.
मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिरवंडे येथे संपन्न झालेल्या मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने भरीव कामगिरी केली. यांत १०० मीटर धावणे प्रकारात १४ वर्षां खालील मुलींमधून कु. निधी चंदन कांबळी हिने पहिला क्रमांक प्राप्त केला.
४०० मीटर धावणे मध्ये कु. लौकिक श्रीगणेश मालवणकर याने दुसरा क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील उंचउडी मध्ये मुलांच्या गटातून कु. दीप भगवान लुडबे याने तिसरा क्रमांक तर गोळफेक प्रकारात कु. वेदांत कुर्ले आणि थाळीफेक मध्ये कु. ब्रायन फर्नांडिस यांनी प्रत्येकी पहिला क्रमांक पटकावला.
आता हे सर्व विद्यार्थी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मालवण तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे यांची प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी अभिनंदन करत प्रशंसा केली आहे आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'