भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक पदी रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे सामाजिक कार्यकर्ते व सागरी जीव, समुद्री जीवन , पर्यावरण अभ्यासक, वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत तसेच मच्छीमार बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी आग्रहीपणे कार्यरत असलेले श्री. रविकिरण तोरसकर यांची भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी नियुक्ती झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. सिंधुदुर्गातील तीन सागरी तालुके,त्याचबरोबर जिल्ह्यातील खाडी व नदी क्षेत्रातील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसाईक यांच्यासाठी भाजपा मच्छीमार सेल कार्यरत आहे.
या नियुक्तीनंतर माध्यमांशी संदेश संवाद साधताना श्री रविकिरण तोरसकर यांनी सांगितले की मत्स्य व्यवसायाला परप्रांतीय अनधिकृत मासेमारी, डिझेल कोटा, एनसीडीसी थकीत कर्जे, सुसज्ज बंदरांचा अभाव, सरकारी योजनां मधील त्रुटी, अपुऱ्या नागरी सोयी सुविधा अशा अनेक विविध समस्या भेडसावत आहेत. भाजपा मच्छीमार सेलच्या माध्यमातून अशा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने उभारी घेणाऱ्या मत्स्यपालन क्षेत्राला उभारी देण्यासाठी विशेष प्रयत्न पालकमंत्री आणि स्वतः मस्त्य शेतकरी असलेले श्री. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. मत्स्य व्यवसाया वर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अंमलबजणी कक्ष स्थापन करणे आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ मिळवुन देणे तसेच मच्छीमार महिला सक्षमीकरण ही आपली प्रमुख उदीष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन आपण कार्यरत राहणार आहे. मच्छीमार पट्ट्यामध्ये भाजपा संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी नियुक्ती केल्याबद्दल रविकिरण तोरसकर यांनि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पालकमंत्री केंद्रीय रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, आमदार नितेश राणे, माजी खासदारडाॅ निलेश राणे, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, अतुल काळसेकर यांचे आभार मानत आहे. पुढील वाटचाली या सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य याबद्दल मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.
श्री रविकिरण तोरसकर यांची भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)