ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
माजी आमदारांची इडी मार्फत १५२ कोटींची मालमत्ता जप्त ; आत्तापर्यंत एकूण ३८६ कोटींच्या मालमत्तेवर इडीने आणली टाच.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माजी आमदारांची इडी मार्फत १५२ कोटींची मालमत्ता जप्त ; आत्तापर्यंत एकूण ३८६ कोटींच्या मालमत्तेवर इडीने आणली टाच.

प्रकाशन: 14 Oct 2023 02:52 AM
वाचन संख्या 147

ब्युरो न्यूज | पनवेल : प्रवर्तन संचलनालय तथा ईडीकडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ‘शेकाप’ चे माजी आमदार विवेक पाटील यांची १५२ कोटींची मालमत्ता इडीने जप्त केली आहे. आता जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा आकडा ३८६ कोटींवर पोहोचला आहे. शेकापचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील हे सध्या कर्नाळा बँक कथित घोटाळा प्रकरणात तळोजा तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली असून, त्यांची १५२ कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली आहे.

यापुर्वी ईडीने २०२१ मध्ये विवेक पाटलांची तब्बल २३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्टस अ‍ॅकॅडमी आणि अन्य ठिकाणच्या जमिनींचाही समावेश आहे. तर आता केलेल्या तात्पुरत्या जप्तीत जमीन, बंगला, निवासी संकुल इत्यादींसह त्यांची कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा समावेश आहे.

ईडीकडून पाटील यांच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा आकडा आता तब्बल ३७६ कोटींवर पोहोचला आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर कर्नाळा बँकेत १ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या बँकेचे ऑडिट झाले, त्यात शेकडो बोगस खाती उघडल्याचे समोर आले, त्यानंतर त्याच्या मागे इडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला, चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. आता पुन्हा एकदा ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी जुलै महिन्यात आपण राजकारणातून निवृत्त होत आहोत अशी तुरुंगातून प्रसिद्धीपत्राद्वारे घोषणा केली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स