ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे श्री भगवती देवालयातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साहात समारोप ; बाप्पांना निरोप देण्यासाठी सागर किनारी उसळला जनसागर..!

मुणगे श्री भगवती देवालयातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साहात समारोप ; बाप्पांना निरोप देण्यासाठी सागर किनारी उसळला जनसागर..!

प्रकाशन: 09 Oct 2023 08:17 PM
वाचन संख्या 332
Article image

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती देवालयातील सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सांगता सोमवारी सायंकाळी विसर्जन मिरवणुकीने झाली. गेले एकवीस दिवस देवालयातील श्री सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी दुपारी विधिवत पूजन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. बौद्धवाडी, सावंतवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी तिठा, आडवळवाडी अशा मार्गाने मुणगे समुद्रकिनारी विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील प्रत्येक वाडीमध्ये गणरायांवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. तर ठिकठिकाणी ग्रामस्थांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.

Article image

यावेळी फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. मुणगे समुद्रकिनारी मुणगे गावचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पांना निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स