शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार सिंधुदुर्ग दौऱ्यावर ; सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी खासदार विनायक राऊत यांची उमेदवारीही झाली निश्चित..!
मालवण | सुयोग पंडित : माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत शिवसेना संघटनेचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग ‘जिल्ह्यात होऊ दे चर्चा’ अभियान चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल त्यांनी सर्वांची प्रशंसा केली तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत,जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, संग्राम प्रभुगांवकर, अमरसेन सावंत,हरी खोबरेकर,बाबुराव धुरी, रुपेश राऊळ,शैलेश परब, राजू नाईक,सचिन सावंत,बंडू ठाकूर,उत्तम लोके यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)