ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सावंतवाडीत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन.

सावंतवाडीत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन.

प्रकाशन: 10 Oct 2021 06:07 PM
वाचन संख्या 129

बांदा : राकेश परब : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन नुकतेच सावंतवाडी नगराध्यक्ष संजु परब, सामाजिक कार्यकर्ते राजु मसुरकर यांच्या हस्ते सावंतवाडी काझी शहाबुद्दीन हाॅल, सावंतवाडी येथे दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर श्री सुनिल राऊळ, आनंद वेंगुर्लेकर, सौ. सुप्रिया मोडक, अतुल कासार,सुधीर पराडकर, मनोज नाईक, डाँ.जनार्धन बावणे, अध्यक्ष सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान प्रकाश तेंडुलकर, उपस्थित होते.
आनंद वेंगुर्लेकर यांनी यापूर्वी अनेक वेळा रक्त करुन एक तरुण पिढीसाठी ठेवलेला आदर्श याबद्दल सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत सचिव कीशोर नाचोणकर तर सुत्रसंचालन बाबली गवंडे यांनी केले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे सदस्य निलेश मोरजकर, महेश राऊळ, राकेश परब, सचिन गुंड, अनिकेत सावंत, संदिप चांदेकर, एकनाथ चव्हाण, श्रेयस नार्वेकर, पप्पी कवठणकर, सिद्धार्थ पराडकर, आदि उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स