ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीत मुला-मुलींसाठी मोफत प्रशिक्षण आहे सुरु ; विविध स्तरांवर २७ खेळाडूंची निवड झालेल्या ॲकॅडमीचे यंदा १४ वे वर्ष.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीत मुला-मुलींसाठी मोफत प्रशिक्षण आहे सुरु ; विविध स्तरांवर २७ खेळाडूंची निवड झालेल्या ॲकॅडमीचे यंदा १४ वे वर्ष.

प्रकाशन: 08 Oct 2023 04:08 AM
वाचन संख्या 383

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील ‘शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी’चे यंदा १४ वे वर्ष आहे. या वर्षीही ॲकॅडमीत मुला मुलींसाठी नियमीत लेदरबाॅल क्रिकेट सराव सुरु झालेला असून जास्तीत जास्त पालकांनी सकाळी ६ :३० ते ८ या कालावधीत त्यांच्या १४ व १६ वर्षांखालील मुलामुलींना नियमीत सरावासाठी पाठवावे असे आवाहन शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे सर्वेसर्वा तथा मुख्य प्रशिक्षक सुधीर साटम यांनी केले आहे.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे लेदरबाॅल क्रिकेट साठी १४ व १६ वर्षांखालील वयोगटात आजपर्यंत २७ खेळाडू विविध स्तरांवर चमकले आहेत.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी द्वारा नियमीत लेदरबाॅल क्रिकेट खेळाच्या मोफत प्रशिक्षणासोबतच या ॲकॅडमीत क्रिकेट संदर्भात इतर ‘करीअर ऑप्शन्स’ची माहिती व चर्चा, तज्ञांचे विशेष मार्गदर्शन तसेच जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धांमध्ये अधिकृत सहभाग अशा अनेक संधी मुला मुलींसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स