मसुरे मार्गाची तड येथील सेवाभावी सात्विक सामाजिक व्यक्तिमत्व श्री. परशुराम कृष्णाजी गोरे कालवश.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे मार्गाचीतड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परशुराम कृष्णाजी गोरे यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. कै. परशुराम गोरे यांनी मसुरे एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये आर. पी. बागवे हायस्कूल मसुरे आणि भरतगड हायस्कूल, देऊळवाडा या प्रशालेमध्ये लिपिक म्हणून आदर्श सेवा बजावली होती. मसुरे येथील विविध सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा ते कार्यरत होते. मसुरे गांवच्या शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. पेट्रो केमिकल इंजिनियर राजेंद्र गोरे यांचे ते वडिल आणि मसुरे येथील पुरोहित राजू गोरे यांचे ते काका होत.
परशुराम गोरे यांच्या निधनाने मालवण तालुका शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून व मसुरे परिसरातून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)