सेवा फाऊंडेशनच्या वेंगुर्ला तालुका संघटक पदी सुधीर भगत ; सेवा फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी जाहीर केली निवड.
नवलराज काळे | सहसंपादक : सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका संघटक पदी सुधीर भगत यांची निवड केली. सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अनेक उद्दिष्टे ठेवून काम करीत आहे. यात प्राधान्याने आरोग्य सेवेचे काम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यभर चालू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या फाउंडेशनने पाय रोवण्याचे चालू केले आहे. येणाऱ्या काळात फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात समाजसेवेची मोठी चळवळ उभी केली जाणारा असून यासाठी फाउंडेशनचा पाया मजबूत करण्याकरिता संघटनात्मक निवडी जाहीर करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका संघटक पदी ही पहिली निवड जाहीर करण्यात आली.
सुधीर भगत यांच्या निवडीबाबत सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे. यावेळी सेवा फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)