ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हास्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे सुयश.

जिल्हास्तरीय थ्रो-बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे सुयश.

प्रकाशन: 02 Oct 2023 01:38 AM
वाचन संख्या 124

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळसुली येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत थ्रो-बॉल क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील वयोगटात मडुरा हायस्कूलने उत्तम कामगिरी केली आणि त्यांचे मुलगे व मुलींचे संघ अजिंक्य ठरले. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले.

तसेच बांदा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील भालाफेक क्रीडा प्रकारात प्रशालेचा लवू प्रशांत नाईक याने द्वितीय क्रमांक पटकावला. थ्रो बॉल स्पर्धेतील दोन्ही विजयी संघ हातकणंगले कोल्हापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघांचे ‘दी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई’ यांचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच, प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. विजयी खेळाडूंचे पंचक्रोशीतून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स