टायर बदलताना जॅक तुटून एस टी बस अंगावर झुकल्याने चालक गंभीर जखमी..!
देवगड | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड एस टी आगाराची मिठबाव -तांबळडेग- कणकवली ही बसफेरी सकाळी देवगड स्थानकातून ६:३० ला मार्गस्थ होऊन मिठबाव बाजारपेठत आल्यावर पंक्चर झाले. चालक प्रकाश उर्फ दादा पवार ( शिरगांव-चाफेडचे रहिवासी) यांनी ते बदलण्याचे काम सुरु केले असता अचानक अचानक जॅक तुटला व काही प्रवाश्यांनी भरलेली बस त्यांच्या अंगावर झुकल्याने ते गंभीर जखमी झाले. बसमध्ये बहुतांश मुंबईला जाण्यासाठी कणकवलीत उतरणारे प्रवासी होते.
स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने चालक प्रकाश उर्फ दादा पवार यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात आणले गेले परंतु दुखापतीचे गंभीर स्वरुप पहाता त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात नेले गेले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)