कसालात गोवा बनावट अवैध दारु प्रकरणी सिंधुदुर्ग नगरी पोलिसांची कारवाई...!
ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल (परबवाडी) येथील, राॅकी फर्नांडिस या इसमावर सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी बिगर परवाना गोवा बनावट दारु प्रकरणी कारवाई केली. त्या इसमाकडून ८०,००० रुपयांची अवैध दारु व वाहतुकीला वापरलेली दुचाकी जप्त केली गेली आहे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. कसालात एकाच आठवड्यात ही सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)