ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल ठरले अव्वल ; 'कल्पना खुळी अंधश्रद्धेचा बळी' एकांकिका केली होती सादर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल ठरले अव्वल ; 'कल्पना खुळी अंधश्रद्धेचा बळी' एकांकिका केली होती सादर.

प्रकाशन: 30 Sep 2023 06:18 PM
वाचन संख्या 183

मालवण | प्रतिनिधी : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला. या प्रशालेने सादर केलेल्या ‘कल्पना खुळी, अंधश्रद्धेचा बळी’ या एकाकीकेची निवड कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय नाट्योत्सवासाठी करण्यात आली आहे.

मालवण येथे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२३-२४ अंतर्गत मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव घेण्यात आला. या विज्ञान नाटयोत्सवाचे उदघाटन मालवणच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या हस्ते झाले.

या विज्ञान नाटयोत्सवात भंडारी हायस्कुल मालवणने सादर केलेल्या ‘कल्पना खुळी, अंधश्रद्धेचा बळी’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकाविले. या नाटिकेचे दिग्दर्शन प्रफुल्ल देसाई यांनी केले होते. या नाटिकेत भावेश वराडकर, सर्वेश करंगुटकर, कृष्णा मांजरेकर, हर्षद सांडव, विश्वदिप बनसोडे, पारस मेस्त्री, भुवन सारंग, देवांग चव्हाण या विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या नाटयोत्सवाचे परीक्षक म्हणून हौशी रंगभूमीवरील अभिनेत्री सुजाता शेलटकर, रंगकर्मी गणेश मेस्त्री यांनी काम पाहिले. भंडारी हायस्कुलच्या या नाटिकेची निवड ३ ऑक्टोबर रोजी कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान नाटयोत्सवासाठी करण्यात आली आहे. यावेळी विस्तार अधिकारी श्री. उदय दीक्षित मुख्याध्यापक एच बी तिवले,आर डी बनसोडे,अरविंद जाधव, संदीप अवसरे,परीक्षक गणेश मेस्त्रीसुजाता शेलटकर आदी उपस्थित होते यावेळी विस्तार अधिकारी श्री. उदय दीक्षित यांनी भंडारी हायस्कूलच्या संघाचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर या यशाबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे अध्यक्ष श्री. विजय पाटकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स