कट्ट्यावर अपघात..!
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी १२:३० च्या दरम्यान एक दुचाकी व एका चारचाकी वाहनामध्ये अपघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार आणि मागे बसलेला इसम हे दोघेही जखमी झालेत. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील चारचाकी गाडी शासनाची आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस घटनास्थळी तत्काळ पोहोचले होते.
फोटो सौजन्य | मालवण ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)