ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओरोसच्या साई काॅलेजचो  'धयकालो' मुंबईत गाजलो ; ५६ वा आंतर विद्यापीठ युवा महोत्सव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओरोसच्या साई काॅलेजचो 'धयकालो' मुंबईत गाजलो ; ५६ वा आंतर विद्यापीठ युवा महोत्सव.

प्रकाशन: 21 Sep 2023 12:17 PM
वाचन संख्या 132

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव अंतर्गत नुकतेच ओरोस येथील साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘धयकालो’ या एकांकिकेला यश मिळाले. यातील कलाकार प्रथमेश देसाई व सेजल शिरवणकर यांना पुरुष व स्त्री अभियानासाठी तर ‘धयकालो’ या एकांकिकेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

५६ व्या युवा महोत्सवाची कला, वाणिज्य आणि विद्यापीठ स्तरावरील अंतिम फेरी नॅशनल कॉलेज बांद्रा येथे संपन्न झाली. या अंतिम फेरीसाठी २४ संघ सहभागी होते. यात ओरोस महाविद्यालयाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या एकांकिकेमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश साबाजी देसाई, सेजल संतोष शिरवंडकर, साक्षी दिगंबर तेली, दीपक मोहन कदम, ओमकार रविंद्र मालवे, रोशनी विजय पालव, प्राची प्रभाकर गोठणकर, दीपलक्ष्मी चंद्रकांत सावंत या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या एकांकिकेचे लेखन व प्रकाशयोजना श्री. राहुल संजय कदम, दिग्दर्शन श्री. सत्यवान बाळा गांवकर तर संगीतसाथ रोहित संजय कदम यांनी केले.

या एकांकिकेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. धनंजय तिवरेकर, प्रा. सोमकांत केळुसकर, त्याचप्रमाणे प्रा. नीलिमा रासम, प्रा. सुभाष बांबुळकर, प्रा. सरिता झेमणे, प्रा. प्रियांका चोरगे, प्रा. वैभव कदम, प्रा. प्रचिती पिळणकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते श्री विजय पाटकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करत मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स