कणकवलीत वागदे येथे दिव्यांग आणि वयोवृद्धांना घरपोच देण्यात आली लस..!
जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांची समाजशील आरोग्यदक्षता
आरोग्य विभागाचे संवेदनशील पाऊल..!
कणकवली | उमेश परब: कणकवली तालुक्यातील वागदे येथे आज वयोवृद्ध,अपंग.,दृष्टिहीन,दिव्यांग आणि पूर्णपणे आजारी असलेल्या लोकांना घरपोच डोस उपलब्ध करून देण्यात आले.
या मोहीमेदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत या जातीने हजर राहून लसीकरणावर लक्ष ठेवून होत्या. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य.सौ सायली समीर सावंत , पं.स.सदस्य मिलिंद मेस्त्री आणि
आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
115 लोकांना डोस आज घरपोच डोस देणेत आले. आरोग्य विभागाच्या या संवेदनशील पावलाबद्दल वागदे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)