गोळवण येथे शिवसेना उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण यांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप..
जन सेवा म्हणजेच ईश्वर सेवा मानणारे नेतृत्व श्री भाऊ चव्हाण असल्याचे जनसामान्यांचे मत..!
ओंकार चव्हाण I पोईप : गोळवण पंचक्रोशी मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कार्यात सदैव तत्पर नेतृत्व म्हणजेच शिवसेना उप विभाग प्रमुख ..! पोईप सुकळवाड विभागा मध्ये सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्या साठी भाऊ चव्हाण शिवसेनेच्या माध्यमातून अग्रसनी आहेत .विभागातील कॅन्सर, हदयरोग पिडीत रुग्ण असोत वा इतर रुग्ण असोत त्यांना शासकीय तसेच सामाजिक संस्थाच्या माध्यमातून कशी भरीव मदत मिळेल म्हणून सदैव प्रयत्नशील तसेच विभागातील निराधार व पिडीत महिला, निराधार पुरुष यांच्या पाठीशी राहून आर्थिक सहकार्य मिळावे म्हणून कार्यशील असे भाऊ चव्हाण यांनी आज गोळवण गावठण वाडीतील होतकरू,गरजू विद्यार्थाना शैक्षणिक साहित्यचे वाटप केले.
यावेळी उपस्थित शिवसेना उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, शाखाप्रमुख सुभाष सामंत,एकनाथ चव्हाण, महीला शाळा प्रमुख प्राजक्ता परब ,मंगल चिरमुले ,उपशाखाप्रमुख धनाजी चिरमुले , हेमंत परब , वासुदेव पावसकर ,संदिप नाईक ,प्रभुगांवकर, गंगाराम गावडे , एम.जी . गावडे . भालचंद्र गावडे, काशिराम गावडे, युवा सेनेचे आनंद चिरमुले आदी मान्यवर उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)