गणेश चतुर्थी निमित्त शिवसेना शिंदे गटाकडून रोणापाल येथील गरजू ग्रामस्थांना साहित्याचे वाटप.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल येथे यंदा २०२३च्या गणेश चतुर्थी निमित्त यंदाच्या वर्षी शिवसेना शिंदे गटाकडून ग्रामस्थांना साहित्य वाटप करण्यात आले आहे.
गणेश चतुर्थी हा कोकणातील मोठा सण आणि महागाई दुष्टीकोनातून विचार करून हे गरजू लोकांना साहित्य वाटप करण्यात आले. सदर साहीत्य वाटप प्रकाश गावडे माजी सरपंच रोणापाल , राजन परब (इन्सुली विभागप्रमुख ( शिंदे गट ) शिवा नाईक शाखा प्रमुख आणि यावेळी रोणापाल मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)