ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गणेशोत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ, मालवण वासियांना 'विधीवत पूजा' साहित्याची प्रसन्न सात्विक भेट ; गेली ११ वर्षे सुरू असलेला उपक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गणेशोत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ, मालवण वासियांना 'विधीवत पूजा' साहित्याची प्रसन्न सात्विक भेट ; गेली ११ वर्षे सुरू असलेला उपक्रम.

प्रकाशन: 16 Sep 2023 06:16 PM
वाचन संख्या 247

लहान ,ज्येष्ठ सर्व जण आवडीने स्विकारतात अशी ही भेट शिवसैनिक प्रसन्नपणे ७५,००० घरांपर्यंत करतात पोहोच.

मालवण | सुयोग पंडित : श्री. गणेशोत्सवा निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या कडून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात ‘विधीवत पूजा’ साहित्याची गेली ११ वर्षे प्रसन्न व सात्विक भेट दिली जाते. कोकणात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो. घरोघरी श्री. गणेशाचे विधिवत पूजन केले जाते. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सव २०२३ साठी, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण वासियांना श्री. गणेश पूजेच्या साहित्याची छोटीशी भेट यावर्षीही दिली आहे. जनतेवर असलेल्या प्रेमाच्या रूपाने आणि श्री. गणेशाच्या श्रद्धेने पूजेच्या साहित्याची छोटीशी भेट जनतेपर्यंत पोहिचविण्याचा आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्न असतो.

फक्त आ. वैभव नाईक नाही तर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तळमळीने कुडाळ मालवण मतदारसंघातील ७५ हजार घरांपर्यंत ही भेट पोहचविण्याचे काम करतात. गेल्या काही वर्षांपासून लहान मुले- मुली देखील आवडीने यात सहभागी होऊन मदत करतात. आमदार वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची नागरीक आवडीने ही भेट स्वीकारून आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा करतात.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स