ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
इंटकला धक्का ; आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत अनेक सदस्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

इंटकला धक्का ; आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत अनेक सदस्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश.

प्रकाशन: 16 Sep 2023 02:26 PM
वाचन संख्या 176

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस प्रणित एस टी कर्मचारी इंटक संघटनेला मोठा धक्का बसला आहे. विभाग अध्यक्ष अशोक राणे यांच्यासह त्यांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. इंटकची बरिचशी कार्यकारिणी भाजपामध्ये गेल्याने एसटी क्षेत्रात इंटक संघटनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

प्रवेश केलेल्यांमध्ये साईनाथ ओटवकर, सचिव इंटक देवगड आगार, संदेश सुरेश साटम देवगड आगार, प्रफुल्ल तोरस्कर देवगड आगार, विनोद उन्हाळकर देवगड आगार, रोहन सुरेश शिंदे विजयदुर्ग आगार, प्रशांत गावडे कुडाळ आगार, भाऊ सावंत वेंगुर्ला उपाध्यक्ष, समीर कदम कुडाळ आगार, संतोष भाट कणकवली आगार, संजय सावंत कणकवली आगार, मनोज पवार कणकवली आगार, वैभव घाणे, • विद्याधर सावंत महेश पाटील सुहास वेदरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

आमदार नितेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, प्रसन्ना उर्फ बाळू कुबल आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स