वडाचापाट ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा सन्मान ; सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई यांचे विशेष मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वडाचा पाट ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शनपर बोलताना सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई म्हणाल्या की दहावी व बारावीच्या गुणवंत विध्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाबासकी देताना आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करियर करून स्वतःचे व गावाचे नांव रोशन करावे. सातत्यपूर्ण अभ्यासातून यशाचा आलेख असाच चढता ठेवा. यापुढेही आवश्यकते नुसार ग्रामपंचायत वडाचापाट तुमच्या पाठीशी असेल
यावेळी सहा पोलीस निरीक्षक संजय संजय डौर, पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण, उपसरपंच सचिन पाताडे, ग्रामसेवक श्री. मगम, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, सविता पालव, विराज पाटकर, शामल मांजरेकर, दर्शना कासले, वेदिका माळकर, श्रीकांत पाटकर, विजय घाडीगावकर, रामचंद्र कासले, भानुदय कासले, दया देसाई, मांजरेकर आदीसह विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दहावीतील विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. आभार ग्रामसेवक श्री. मगम यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)