ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजप, शिवसेना, काॅन्ग्रेस व राष्ट्रवादी या चारही पक्षांनी जिल्ह्याला फसवले ;
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजप, शिवसेना, काॅन्ग्रेस व राष्ट्रवादी या चारही पक्षांनी जिल्ह्याला फसवले ;

प्रकाशन: 15 Sep 2023 06:06 PM
वाचन संख्या 96

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांची खरमरीत टीका.विकास कामांना श्रेयवादामुळे खिळ बसत असल्याचा केले प्रतिपादन.

कणकवली | प्रतिनिधी : मनसे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर उपरकर यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व त्यांच्या धोरणांबद्दल सडकून खरमरीत टीका केली आहे. गेले १५ वर्षे सत्तेत असलेले भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही पक्षांच्या नेत्यांनी जिल्ह्यातील जनतेला फसवले आहे चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी सगळे झटत होते. त्यावेळी केसरकरांनी गणपती विमानातून आणला तर राणेंनी गाजावाजा केला. तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईकांनी विमानतळासाठी काय केले हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या वाहतूक ठप्प झाल्यावर श्रेय घेणारे कुठे आहेत असा खडा सवार उपरकर यांनी केला.जिल्ह्याचे पालकमंत्री हेच बांधकाम मंत्री चव्हाण असताना जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते, राज्य मार्ग व अन्य रस्त्यांवर खड्डे आहेत. त्या खड्डयांमधूनच प्रवास गणपती बाप्पाला करावा लागणार असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.चिपी विमानतळावर माजी पालकमंत्री केसरकरांनी गणपती आणत पूजा करुन गणेशोत्सव काळात दिखावा केला. त्यानंतर राणेंनी मी केले असे सांगितले. शिवसेना नेत्यांनीही तसाच आव आणला. आताचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणेशोत्सव काळापासून कायमस्वरूपी विमान सेवा सुरु करतो असे सांगितले होते. त्या चाकरमान्यांना आता एका हॉटेल मध्ये ठेवावे लागले हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याचे टीका परशराम उपरकरयांनी केली.कोकणी माणसाला प्रत्येक गोष्टीत पालकमंत्र्यांनी फसवले आहेत. जनतेला फसवण्याचे काम स्थानिक खासदार आणि आमदार करताहेत. पालकमंत्र्यांनी रेल्वे सुशोभिकरण करण्यासाठी पुण्याचे ठेकेदार आणले. मात्र, पालकमंत्री चाकरमानी न भिजता आणण्याचे बोलत होते, ते निवारा शेड देखील केले नाहीत. जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहेत. हे आम्ही सांगत नाही तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी २० कोटी रुपयांची मागणी करत सांगितले आहे. ते पैसे देखील पालकमंत्री जिल्ह्यातील ७० कोटी विकास ठेकेदारांचे बाकी आहेत. जनतेला आणि गणेश भक्तांना खड्डयातूनच बाप्पाला आणावे लागणार आहे. गेल्या पंधरा वर्षांनंतरही राज्य, जिल्हा, ग्रामीण मार्ग खड्डेमय झाल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केलाआहे.पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात लक्ष नाही. सर्वच शासकीय विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचन राहिलेला नाही काही अधिकारी कामांवर दुर्लक्ष करत आहेत पालकमंत्री जनतेच्या हितासाठी काम करणार की स्वतःच्या फायद्यासाठी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपावाले पालकमंत्र्यांचा व्हिडिओ फिरवतात, विकासासाच्या आड येणाऱ्या लोकांना मी पाहून घेतो. पण आम्ही विकास करा, असेच सांगतो असे प्रतिपादन परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी केले आहे. विकासाला खिळ कशाला असाही सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे. लोकोपयोगी विकासकामांना या सर्व पक्षांच्या श्रेयवादामुळे खिळ बसत असल्याचे प्रतिपादन मनसे सरचिटणीस परशुराम ऊर्फ जिजी उपरकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स