ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे देऊळवाडा शाळेला आनंद तांबे व सुगंध तांबे यांच्याकडून साऊंड सिस्टिमची देणगी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे देऊळवाडा शाळेला आनंद तांबे व सुगंध तांबे यांच्याकडून साऊंड सिस्टिमची देणगी.

प्रकाशन: 15 Sep 2023 06:15 PM
वाचन संख्या 34

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळेमध्ये संपन्न होत असलेले विविध सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेची गरज ओळखून मसुरे देऊळवाडा येथील रहिवासी तथा पदवीधर प्राथमिक शिक्षक श्री. आनंद मानाजी तांबे व श्री. सुगंध मानाजी तांबे यांनी शाळेसाठी ‘साऊंड सिस्टिम’ भेट म्हणून दिली.

देऊळवाडा शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळावी यासाठी ही भेट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या देणगी बद्दल देऊळवाडा शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर तसेच सर्व शिक्षक व पालकांनी विशेष आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स