ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सिंधुदुर्ग पोलिसांनी केले गणेशभक्तांचे स्वागत..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग पोलिसांनी केले गणेशभक्तांचे स्वागत..!

प्रकाशन: 15 Sep 2023 05:48 PM
वाचन संख्या 120

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागामार्फत खारेपाटण येथे गणेशभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खारेपाटण येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना जिल्हा वाहतूक शाखा महिला पोलीस निरीक्षक रिज़वाना नदाफ़ यांनी पुष्पगुच्छ देऊन गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी जिल्हा वाहतुक शाखा पोलिस निरीक्षक रिज़वाना नदाफ़ , हवालदार रामदास जाधव, पो हवालदार वर्षा मोहिते, पो.हवालदार राहुल वेंगुर्लेकर, खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रचे अंमलदार उध्दव साबळे, पराग मोहीते, प्रशांत लोके आदी पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. खारेपाटण येथे गणेशभक्तांच्या स्वागतासाठी विविध सेवा सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. गणेशभक्तांच्या सेवेसाठी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच खारेपाटण टाकेवाडी येथे मोफत सुविधा केंद्राची उभारणी केली असून ही सुविधा केंद्रे गणेशभक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहेत. येणाऱ्या गणेशभक्तांना कोणतीही अडचण असेल तर या सुविधा केंद्राच्या मदतीने त्यांची अडचण दूर केली जाणार असून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने ही सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस मदत केंद्र, वैद्यकीय सेवा केंद्र, विश्रांती कक्ष, चहा-बिस्कीट व्यवस्था, सुलभ शौचालय व्यवस्थेची गणेशभक्तांच्या सेवेसाठी उभारणी केली आहे. आरोग्य पथकांच्या वतीने गणेशभक्तांना कोणत्याही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या वैद्यकीय सेवा केंद्राच्या मदतीने सोडवण्यासाठी आरोग्य पथक देखील ठेवण्यात आले आहे.त्यामुळे कोकणात येणाऱ्या सर्वगणेशभक्तांनी आपल्याला हव्या असणाऱ्या या सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स