ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वार्थासाठी पक्ष बदलूंना कुडाळची जनता स्विकारत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल ; आमदार वैभव नाईक यांचे शिवसेना उ.बा.ठा. पक्षाच्या तालुका कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वार्थासाठी पक्ष बदलूंना कुडाळची जनता स्विकारत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल ; आमदार वैभव नाईक यांचे शिवसेना उ.बा.ठा. पक्षाच्या तालुका कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन.

प्रकाशन: 12 Sep 2023 10:30 PM
वाचन संख्या 193

लवकरच गांवागांवात ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रम राबविण्याची संजय पडते यांचे संकेत तर महागाईचा रोष महिला मतदानातून व्यक्त करतील असा जान्हवी सावंत यांचा विश्वास.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक काल कुडाळ मधील महालक्ष्मी हाॅल येथे संपन्न झाली. या बैठकीला संबोधीत करताना आमदार वैभव नाईक म्हणाले की कुडाळ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या आधीच्या लोकप्रतिनिधींनी सत्तेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक पक्षांशी गद्दारी केली. कुडाळच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. निवडणूक आली की पक्ष बदलायचा आणि विकासाच्या खोट्या वल्गना करायच्या हा विरोधकांचा धंदा आहे. आता सत्तेत असताना विकास करण्यापासून त्यांचे हात कोणी बांधले आहेत? मलाही अनेक आमिषे देण्यात आली परंतु शिवसेनेशी असलेली निष्ठा आणि जनतेने दोन वेळा दाखवलेल्या विश्वासास मी तडा जाऊ दिला नाही आणि देणारही नाही. आता जे कोणी उमेदवार म्हणून फिरतायत त्यांना जनतेने याआधी ५ वर्षे संधी दिली होती. मात्र ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले नाहीत. त्यांच्या माध्यमातून झालेले एकही काम जनतेला आठवत नाही. मी जे काही काम केले आहे ते जनतेच्या डोळ्यांसमोर आहे. आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले आहे. राणेंची धडपड खाजगी विकासासाठी सुरु आहे. याआधी सत्तेच्या माध्यमातून पडवे येथे खाजगी हॉस्पिटल सुरु केले. आता त्या हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ४ कोटीच्या कामावर असलेली स्थगिती उठविण्यात आली. मात्र छोट्या छोट्या रस्त्यांवर अजूनही स्थगिती आहे. याउलट पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही पाठपुरावा करून शासकीय मेडिकल कॉलेज, शासकीय महिला बाल रुग्णालय सुरु करून दाखवले. त्यामुळे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलूंना कुडाळची जनता स्वीकारत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल.

यावेळी संजय पडते म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून आमदार वैभव नाईक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सत्तेत येण्यासाठी अनेक आमिषे त्यांना आली तरी त्यांनी पक्षाशी आणि ठाकरे परिवाराशी असलेली निष्ठा सोडली नाही. इतर आमदार वेगवेगळ्या अमिषाला बळी पडले असले तरी वैभव नाईक निष्ठावंत राहिले याचा आम्हाला अभिमान आहे. कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पोचून लोकांचे प्रश्न लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवावेत आणि बालेकिल्ला अबाधित ठेवावा. शिवसेनेच्या माध्यमातून लवकरच गांवागांवात ‘होऊ दे चर्चा’ हा कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सौ. जान्हवी सावंत म्हणाल्या कोरोना काळात आमदार वैभव नाईक जीवाची पर्वा न करता लोकांना मदत करण्यासाठी गावोगावी फिरत होते. हे जनता विसारणार नाही. प्रत्येक दिवशी त्यांच्या माध्यमातुन लोक हिताचे काम होत आहे. पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला उत्तम रित्या सांभाळले. आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिली. मात्र आताचे सरकार पक्ष फोडाफोडीचे काम करत आहे. त्यांना केवळ सत्ता पाहिजे जनतेशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. महागाईचा भडका उडाला असताना सरकार मधील कोणीही त्यावर बोलत नाही. घर चालवताना महिला मेटाकुटीस आल्या असून निवडणुकीत मतदानाच्या रूपाने आपला रोष त्या व्यक्त करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,कुडाळ शिवसेनेचे नेते अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,शहर प्रमुख संतोष शिरसाट,उपसभापती जयभारत पालव, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी,सुशील चिंदरकर,राजू गवंडे, राजू कविटकर, दीपक आंगणे, नरेंद्र राणे, नागेश ओरोस्कर, विकास राऊळ, महेश सावंत, मिलिंद नाईक,गंगाराम सडवेलकर, सुधीर राऊळ,संदीप सावंत, शेखर गावडे, अजित परब, संदेश प्रभू,नगरसेवक उदय मांजरेकर,नगरसेविका ज्योती जळवी, श्रुती वर्दम, आरोही चव्हाण,अमित राणे, सागर भोगटे,चंदू मुंडये, रुपेश वाडयेकर, सचिन गावडे, मिलिंद नाईक, विनय गावडे, काका गावडे, अजित परब, मुकुंद सरनोबत, अशफ़ाक कुडाळकर, बापू बागवे, दिनेश वारंग, लक्ष्मण घाडीगावकर, नरेंद्र राणे,बाजीराव झेंडे, वैशाली पारकर, समीक्षा जाधव, दक्षता मेस्त्री, वेदिका दळवी, प्राची सावंत, अनघा तेंडोलकर,भक्ती घाडीगावकर, गौतमी कासकर, गुरु गडकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स