ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
शिरगाव-शेवरे उपसरपंचपदी संतोषकुमार फाटक यांची बिनविरोध निवड
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिरगाव-शेवरे उपसरपंचपदी संतोषकुमार फाटक यांची बिनविरोध निवड

प्रकाशन: 06 Sep 2023 11:32 AM
वाचन संख्या 59

शिरगांव/ संतोष साळसकर देवगड तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत शिरगाव शेवरे च्या उपसरपंचपदी भाजपाचे संतोषकुमार फाटक यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव-शेवरेचे उपसरपंच अमित साटम यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी ग्राम सचिवालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसरपंचपदासाठी संतोषकुमार फाटक हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नवनिर्वाचित उपसरपंच संतोषकुमार फाटक यांचे भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, सोसायटी चेअरमन मंगेश लोके, संचालक संतोष तावडे, पोलिस पाटील चंद्रशेखर साटम, माजी पंचायत समिती सदस्या सौ. अपूर्वा तावडे, माजी सरपंच संजय रुपये, रिक्षा चालक-मालक संघाचे संतोष जंगले, सदाशिव चव्हाण, विनोद आईर, महेश चौकेकर, शैलेंद्र जाधव, पांडुरंग घाडी, विनोद सरफरे, हडपिडचे उपसरपंच दाजी राणे, बंडू माने, मंगेश फाटक, अनिल फाटक, सूर्यकांत फाटक, परशुराम फाटक, बापू फाटक, हेमंत फाटक, शरदचंद्र फाटक, बाबी फाटक, गुरुनाथ फाटक, गगन फाटक आदींनी अभिनंदन केले. यावेळी सरपंच समीर शिरगावकर, ग्रामपंचायत सदस्य अमित साटम, राजेंद्र शेट्ये, मंगेश धोपटे, स्वाती साटम, वैष्णवी आईर , शीतल तावडे, प्रेरणा कुबडे, स्नेहा मेस्त्री, मयूरी चौकेकर, ग्रामविकास अधिकारी दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच संतोषकुमार फाटक म्हणाले की, ग्रामविकासाला नेहमीच प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करीन. अनुभवी असलेल्या थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन व सूचना ग्रामविकास करताना माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. सर्व घटकांना बरोबर घेऊन राजकारण विरहित लोकाभिमुख ग्रामविकास करून आपण माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थक करून दाखवीन.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स