कै. संतोष गुरखे प्रतिष्ठान वैभववाडी आयोजीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तूंचे वाटप.
सहसंपादक नवलराज काळे-५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून वैभववाडी तालुक्यातील वायंबोशी गावचे सुपुत्र कै. संतोष गुरखे (प्राथमिक शिक्षक )यांच्या जन्मदिना निमित्त वायंबोशी, विद्या मंदिर शिराळे, सडूरे नं.१, विद्या मंदिर तांबळघाटी, विद्या मंदिर चव्हाणवाडी या शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या प्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष स्वप्नील गुरखे, मोतीराम गुरखे, प्रभाकर कोकरे, बाबू अडूळकर, भागोजी अडूळकर, धुळाजी अडूळकर, बबन गुरखे, नाऊ लांबोर, बंडु अडूळकर व लक्ष्मण काळे,वायंबोशी सडूरे व शिराळे गावातील सर्व ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विनोद कर्पे सर, केळकर मॅडम , कुवर सर, खांबल मॅडम, भैराळे सर, कांबळे सर आदी शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)