ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आंतरराष्ट्रीय शुटींगबॉल पंच अशोक दाभोलकर याना गुरूवंदना जीवनगौरव सन्मान पुरस्कार जाहीर!

आंतरराष्ट्रीय शुटींगबॉल पंच अशोक दाभोलकर याना गुरूवंदना जीवनगौरव सन्मान पुरस्कार जाहीर!

प्रकाशन: 03 Sep 2023 01:09 PM
वाचन संख्या 53

मसुरे | प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा संस्कृती प्रचारक व भूतपूर्व शुटिंगबाॅल फेडरेशन पंच व स्पर्धा नियंत्रक श्री. अशोक गणेश दाभोलकर -मेस्त्री, दाभोली, वेंगुर्ला ह्याना त्यानी दिलेल्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शिक्षण दिन व भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन ह्यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा गुरूवंदना जीवनगौरव सन्मान पुरस्कार २०२३ ने गौरविण्यात येणार आहे.०३ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज स्मारक सभागृह, कोल्हापूर, महाराष्ट्र येथे श्री. प्रकाश वेळीप (माजी शिक्षण मंत्री, कृषी मंत्री, पंचायत मंत्री, गोवा राज्य) ह्यांचे शुभहस्ते अशोक दाभोलकर ह्यांना गौरविण्यात येणार आहे. ह्या प्रसंगी डॉ. हणमंत शिरगुप्पे ( चेअरमन- अनुराधा अर्बन निधी बॅंक, गडहिंग्लज), धनंजय महाडिक (राज्यसभा खासदार, कोल्हापूर), श्री. शंभू बांदेकर (माजी उपसभापती, गोवा), सौ. रजनीताई शिंदे ( संस्थापक अध्यक्षा- वेध फाऊंडेशन, इचलकरंजी), श्री. सुर्यकांत सावंत (उद्योजक -कणकवली),‌ श्री .अनिल मोरे, सिने अभिनेते तसेच मा. सचिव, प्रा. डॉ. बी. एन. खरात ( अध्यक्ष- विद्यार्थी विकास अकादमी) , सुनील शेट ( अध्यक्ष – गोवा हिंदी अकादमी) आदी मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत.दाभोलकर याना यापूर्वी सुध्दा अनेक पुरस्कार जाहीर झाले असून त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स