ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

प्रकाशन: 03 Sep 2023 01:04 PM
वाचन संख्या 46

बांदा /राकेश परब: सध्या देशात व राज्यात सध्या असलेल्या सत्ताधाऱ्यांपासून जनतेला मुक्त करण्यासाठी देशव्यापी आघाडी तयार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सक्रिय मार्गदर्शन यासाठी लाभत आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत राज्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेर्ले, पडवे माजगाव व इन्सुली येथील श्री. गौरांग शेर्लेकर, सौ. प्रतीक्षा गवस, श्री. प्रवीण गवस, सौ. स्वरा पेंडुरकर, श्री. रवींद्र बांदेकर श्री. प्रसाद देसाई, श्री. नंदू कदम, श्री. अमर धुरी, श्री. दिनेश शेर्लेकर, श्री. लाडू धुरी ईत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सौ. अर्चना घारे यांनी त्यांचे स्वागत करून आदरणीय पवार साहेबांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, विशाल पांगम, संतोष जोईल, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, युवक उपाध्यक्ष विवेक गवस, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, ओबीसी सेल दोडामार्ग तालुकाध्यक्ष उल्हास नाईक, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष संजय भाईप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स