ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते बांधकाम सभासद नोंदणी व घरेलू महिला कामगार शिबिराचा शुभारंभ ; शिबिराला मिळाला व्यापक प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते बांधकाम सभासद नोंदणी व घरेलू महिला कामगार शिबिराचा शुभारंभ ; शिबिराला मिळाला व्यापक प्रतिसाद.

प्रकाशन: 31 Aug 2023 09:23 PM
वाचन संख्या 160

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) बोर्डवे शाखेच्या वतीने आयोजीत ‘भव्य बांधकाम सभासद नोंदणी शिबीर आणि घरेलू महिला कामगार सभासद नोंदणी शिबीर’ या उपक्रमाचा शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला.

ग्रामीण भागात बांधकाम सभासद नोंदणी शिबीर आणि घरेलू महिला कामगार सभासद नोंदणी कमी प्रमाणात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली बोर्डवे गावात विनामूल्य बांधकाम सभासद नोंदणी आणि घरेलू महिला कामगार सभासद नोंदणी बोर्डवे विनायक ट्रेडर्स येथे राबविण्यात आली. यावेळी १५० पेक्षा जास्त महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोर्डवे ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड आणि कळसुली उपविभागीय अध्यक्ष शरद साळवी यांचे बोर्डवे गावात विनामूल्य नोंदणी शिबिर आयोजित केल्याबद्दल महिला वर्गाकडून विशेष समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले , कळसुली उपविभागीय अध्यक्ष शरद साळवी, बोर्डवे शाखाप्रमुख ग्रा.पं.सदस्य महादेव राठवड, ग्रा.पं. सदस्य सौ. शुभदा शिंदे, पांडुरंग कारेकर, नरेश येंडे,स्वप्निल खांदारे, , सौ. निलाक्षी सोहनी, युवासेना अध्यक्ष- स्वप्निल शिंदे , प्रकाश शिंदे विनोद परब, साक्षी येंडे विनायक राठोड , वनिता कारेकर ओंकार गुरव, रिमेश चव्हाण यांच्यासह बोर्डवे गांवातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स