अज्ञात वाहनाने धडकेत आज आंबोलीत २ म्हैशींसह वासराचा जागीच मृत्यू ; पशूपालकाचे अतोनात नुकसान.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आंबोली येथील नांगरतास येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने पशूपालक विठ्ठल जंगले यांच्या २ म्हैशी आणि १ वासरु जागीच मृत्यू झाला. ही घटना आज संध्याकाळी ६ : ३० च्या सुमारास घडली. आंबोली पोलिसांना ही घटना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
अज्ञात वाहनाबाबत पोलीसांनी पुढील तपास करण्याची मागणी म्हैस व वासरु यांच्या पशूपालकांनी केली आहे. या दुर्घटनेत पशूपालकांचे मोठे नुकसान झाल्याचेही समजते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)