ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सरकारी नोकरी करु इच्छिणार्यांसाठी आजपासून बंपर भरती सुरु..!

सरकारी नोकरी करु इच्छिणार्यांसाठी आजपासून बंपर भरती सुरु..!

प्रकाशन: 29 Aug 2023 12:45 PM
वाचन संख्या 381

आरोग्य विभागात ११००० पदांसाठी भरती केली जाणार असल्याची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती .

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र शासनातर्फे सरकारी नोकरी करु इच्छिणार्यांसाठी बंपर भरती सुरु होत आहे. आजपासून अनेक विद्यार्थी वर्षोनुवर्षे सरकारी नोकरीसाठी अभ्यास करतात. हे विद्यार्थी नोकरीसाठी योग्य भरतीची प्रतिक्षा करतात.
त्यानंतर भरती जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करुन नोकरी मिळवतात. राज्यात कोरोना संकट काळात दोन वर्ष कोणतीही भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती. पण कोरोना संकटानंतर सातत्याने वेगवेगळ्या विभागांसाठी सरकारी नोकरी जाहीर होत आहे. आतादेखील अशी भरती जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गृह विभागाकडून पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. नंतर वन विभागाकडून वन संरक्षक आणि मसहूल विभागाकडून तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. तलाठी भरतीच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. राज्यात सध्या तलाठी पदाच्या ४६६६ जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या भरतीसाठी २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राज्यात आजपासून आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात ११००० पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना यासाठी आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची देखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी देखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

या संदर्भात Sarkari Naukri App डाऊनलोड करावा अथवा www.govnokri.in या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेऊन नोंदवायची आहे. आज २९ ऑगस्ट २०२३ ला दुपारी ३ वाजता ही नोंदणी सुरु होत असून १८ सप्टेंबर २०२३ ही नोंदणीची शेवटची तारीख आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स