ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मुलांना जगावर प्रेम करायला शिकवा ; ॲड. श्रीपती शिंदे यांनी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेतील चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले मार्गदर्शन.

मुलांना जगावर प्रेम करायला शिकवा ; ॲड. श्रीपती शिंदे यांनी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेतील चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले मार्गदर्शन.

प्रकाशन: 28 Aug 2023 11:15 AM
वाचन संख्या 188

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा शाखेत प्रा. मधु दंडवते व साथी लक्ष्मण जाधव जन्मशताब्दी निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार श्रीपती शिंदे यांच्या हस्ते झाला. मुलाना जगावर प्रेम करायला शिकवा. मुलांच्या उपजत कलांना चांगले मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे असे मार्गदर्शन यावेळी माजी आमदार श्रीपती शिंदे म्हणाले.

साथी सुरेश शिपुरकर यांनी सेवांगणच्या उपक्रमांचे कौतुक केले वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे समतेचा विचार पसरवण्याचे कार्य सेवांगण करत आहे याचा फार आनंद होतो असे प्रतिपादन त्यानी केले. अपना बाजारचे जगदिश नलावडे यानी प्रा. मधु दंडवते व साथी लक्ष्मण जाधव यांच्या कार्याची ओळख करू दिली या पुढेही अनेक कार्यक्रम संयुक्तपणे आखले जातील याची ग्वाही दिली. देवरुखचे युयुत्सु आर्ते यानी मुलांमधील रुज़ुता जीवंत ठेवा व त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला करियर करू द्या असे आवाहन शिक्षक व पालकांना केले.

प्रारंभी किशोर शिरोडकर व लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सेवांगणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून इचलकरंजीचे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते संजय रेंदाळकर यानी संपादित केलेले प्रा. मधु दंडवते यांच्या चरित्रा वर आधारीत
ध्यासपर्व या पुस्तकाचे ॲड. श्रीपती शिंदे व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या चित्रकला स्पधेला ४५ शाळातील ११०० विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातील ११० गुणवंत विद्यार्थ्याना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तिपत्रके व शालेय वस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम ३ विद्यार्थी श्रेया समीर चांदरकर, ममता आंगचेकर, रिया भगत यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमिताने दीपक भोगटे यांनी चितारलेले रेखाचित्र ॲड. श्रीपती शिंदे यांचे स्केच शिंदेना भेट स्वरुपात देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळकृष्ण नांदोसकर यानी केले. या कार्यक्रमाला बापू तळावडेकर, उषा वेंगुलेकर, सिंधू नलावडे, दीपक भोगटे, मयेकर मॅडम, बबलू प्रभुगांवकर, सौ प्रभुगावकर, भोगले सर आणि शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 326

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स