स्वामी समर्थ भाविकांसाठी उघडले हडपीड गावच्या मठातील माऊलींचे द्वार....!
ब्यूरो न्यूज | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ गुरुवारी घटस्थापना मुहूर्तावर शासनाच्या निर्देशा नुसार भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. येथील रहिवाशी श्री.दत्ताराम शंकर राणे ह्या उभयतांना मठाचे महाद्वार उघडण्याचा मान देण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे, श्री विनोद आईर, नंदकुमार य राणे, दत्ताराम राणे, सौ राणे, श्री.जाधव सर, श्री शिवलिंग ज़गम पुजारी आदी उपस्थित होते.
सर्वांनी कोरोनाचे नियम पाळूनच स्वामी मठात स्वामींचे आशीर्वाद घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी सक्तीने व भक्तीने आरोग्यविषयक नियम पाळण्याचे आवाहन स्वामी भक्तांना केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)