ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अवैध दारु वाहतुकीवर बांदा पोलीसांनी केली कारवाई.

अवैध दारु वाहतुकीवर बांदा पोलीसांनी केली कारवाई.

प्रकाशन: 07 Oct 2021 11:28 PM
वाचन संख्या 48

अडीच लाखांच्या दारुसह इतर मुद्दे माल जप्त

बांदा | राकेश परब : गोव्यातून सरमळे येथे केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८१ हजार रूपयांच्या दारूसह एकूण दोन लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी डिट्टो तंगचद (रा. एर्नाकुलम केरळ, सध्या रा. सरमळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली जीप (केएल ०१ के २९९०) ताब्यात घेण्यात आली. बांदा पत्रादेवी सीमेवरील दत्तमंदिर येथे बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणार्‍या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलीस सीमेवर नजर ठेवून आहेत. बुधवारी मध्यरात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पत्रादेवी दत्तमंदिरकडे बांद्याकडे येणारी जीप तपासणीसाठी थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान जिप मध्ये वरच्या बाजूस चोरकप्पा बनविल्याचे निदर्शनास आले. या चोरकप्प्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या भरण्यात आल्या होत्या. पोलिसांनी दारुसह मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस शिपाई प्रथमेश पवार यांनी केली. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स