ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाप्रसारामुळे प्रशासन देतेय लसीकरणाला प्राधान्य..

जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाप्रसारामुळे प्रशासन देतेय लसीकरणाला प्राधान्य..

प्रकाशन: 07 Oct 2021 04:35 PM
वाचन संख्या 60

सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाची माहिती…..

ओरोस | प्रतिनिधी : उत्सव उत्साहाचेच सध्या वातावरण जरी असले तरिही कोरोना लसीकरणाची गरज प्रशासनाने प्राधान्याने ओळखत लसीकरणावर भर दिला आहे.कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 81 हजार 811 नागरिकांनी पहिला डोस घेतला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 31 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 916 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 656 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षांवरील 1 लाख http://localhost/news/public/uploads/20 हजार 229 व्यक्तींनी पहिला डोस तर 79 हजार 841 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 42 हजार 242 नागरिकांनी पहिला डोस तर 88 हजार 504 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 99 हजार 589 जणांनी पहिला डोस तर 69 हजार 101 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. अशा एकूण 7 लाख 35 हजार 944 लसी देण्यात आल्या आहेत.जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 25 हजार 720 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 5 लाख 51 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 74 हजार 240 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 5 लाख 69 हजार 599 कोविशिल्ड आणि 1 लाख 66 हजार 345 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 35 हजार 944 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 35 हजार 540 लसी उपलब्ध असून त्यापैकी 23 हजार 150 कोविशिल्डच्या आणि 12 हजार 390 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 900 लसी शिल्लक असून त्यापैकी 450 कोविशिल्ड आणि 450 कोवॅक्सीनच्या लसी आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.



  

.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स