ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भल्ली भल्ली भावय...चाफेड - गावठण येथील कुलस्वामिनी मंदिरात भावई उत्सव उत्साहात
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भल्ली भल्ली भावय...चाफेड - गावठण येथील कुलस्वामिनी मंदिरात भावई उत्सव उत्साहात

प्रकाशन: 22 Aug 2023 03:38 PM
वाचन संख्या 85

शिरगाव | संतोष साळसकर: भल्ली भल्ली भावय… म्हणत खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करत… ढोलताशांच्या गजरात देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील श्री कुलस्वामिनी मंदिरात भावई उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

या उत्सवाला वरुणराजाने दडी मारल्यामुळे ग्रामस्थांनी चिखल तयार करण्यासाठी कृतीमरित्या पाण्याचा वापर करण्यात आला.

या उत्सवाची सुरवात संपूर्ण मंदिराला ढोलताशांच्या गजरात एकमेकांवर चिखलफेक करत ५ प्रदक्षिणा घालून करण्यात येते.

त्यानंतर मंदिराच्या समोर एका ठिकाणी खोलवर श्रीफळ पुरण्यात येते. हे श्रीफळ काढण्यासाठी सभोवार सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन प्रयत्न करतात. त्याला *सापड खेळणे* असे म्हणतात.

यावेळी लहान मुलांचा सहभाग बघण्यासारखा होता. यावेळी लहान मुलांनी गोल रिंगण करून तो पुरलेला नारळ काढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसत होता.

सोबत ढोलताशांच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. हा उत्सव बघण्यासाठी सर्व ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स