पोईप येथे २३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव!
मसुरे | प्रतिनिधी : प्रकल्प संचालक आत्मा सिंधुदूर्ग, तालूका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व ग्रामपंचायत पोईप यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता तालूकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत पोईप येथील सभागृहामध्ये करण्यात आले आहे.रानभाज्यांच्या पाककला स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी स्पर्धकांनी कृषी सहायक श्री. मिलींद कदम (९४२१२६७७३१) यांच्याशी २२ ऑगस्ट पर्यंत संपर्क साधावा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)