ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ऐलमा पैलमा अक्षरदेवाची दशकपूर्तीकडे वाटचाल सुरू
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ऐलमा पैलमा अक्षरदेवाची दशकपूर्तीकडे वाटचाल सुरू

प्रकाशन: 21 Aug 2023 10:59 AM
वाचन संख्या 191

कणकवली / सहिष्णू पंडित : ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाला यंदा नऊ वर्षे पूर्ण होत असून आता दशकपू्र्ती उत्सवाकडे वाटचाल सुरु झाली आहे.रविवार दि.20 रोजी कणकवलीतील बावर्ची हाॅटेलमध्ये या समूहाची सभा घेण्यात आली.या सभेत येत्या वर्षभरात जे विशेष साहित्य केंद्रित उपक्रम होणार आहेत त्याबद्दल नियोजन करण्यात आले. सोशल मीडियाचा डोळस वापर काही उपक्रमात केला जाणार असून समाज आणि साहित्य यांचा समन्वय असण्याची समुहाची आग्रही भूमिका राहील असे समूह सदस्याकडून सांगण्यात येते.याच वेळीसमूहातील ज्येष्ठ सदस्य अनुराधा दीक्षित यांच्या ‘भावसंवाद’या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ही समूह सख्यांच्या मेळाव्यात करण्यात आले.या मेळाव्यात मालवणमधील वैशाली पंडित, डॉ‌.सुमेधा नाईक, सानिका वायंगणकर,माणगांव येथील डॉ. मेधा फणसळकर, स्नेहल फणसळकर, न्हावेली मधील स्मिता नाईक, देवयानी आजगावकर, सावंतवाडीतून संगीता तोरस्कर,फणसगावच्या अलका नारकर,कणकवलीच्या संपदा प्रभुदेसाई, देवगडच्या अनुराधा दीक्षित आणि वेंगुर्ल्याच्या मधुरा आठलेकर या साहित्यिक उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स