ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे ७७वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे ७७वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..

प्रकाशन: 20 Aug 2023 09:15 PM
वाचन संख्या 85

कणकवली /नवलराज काळे: शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी सव्वा आठ वाजता सर्व विद्यार्थी, शिक्षक, शालेय समिती पदाधिकारी, पालक यांच्या उपस्थितीत शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत, देशभक्तीपर गीते गायली. तसेच निपुण भारत व तंबाखू मुक्त ची प्रतिज्ञा घेतली. शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे साहेबांच्या 56 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तर्फे विद्यार्थी व पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते सदर आरोग्य शिबिरास डॉ. विद्याधर तायशेटे डॉ.अमेय मराठे, डॉक्टर रुपेश महाडेश्वर, डॉ.सर्वेश तायशेटे,डॉक्टर तन्वी खरे असे नामवंत डॉक्टर तपासणी साठी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांची जनरल चेकअप, डेंटल चेकअप व स्किन चेकअप या तपासण्या झाल्या तसेच पालकांसाठी ब्लड शुगर, ब्लड प्रेशर व जनरल चेकअप या तपासण्या झाल्या. या आरोग्य तपासणी अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालकांना मोफत औषधे पुरवण्यात आली .सदर औषधे शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे साहेब यांच्यातर्फे देण्यात आली. कार्यक्रमाला शालेय समितीचे सदस्य श्री मोहनराव सावंत,गुरुकुल समितीचे उपाध्यक्ष श्री विजय सावंत मुख्याध्यापिका अपूर्वा दीपक सावंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे साहेबांनी प्रास्ताविक सादर केले त्यानंतर रोटरी क्लब कणकवली सेंट्रल चे अध्यक्ष रवी परब सरानी मनोगत व्यक्त केले. तसेच डॉक्टर विद्याधर तायशेटे सरांनी मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारचे शिबिर दरवर्षी शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे घेऊ असे सांगितले. मुख्याध्यापिका अपूर्वा सावंत मॅडम यांनी आभार व्यक्त केले व मुलांना खाऊचे वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स