ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वराड  प्रशालेत वृक्षरोपण!

वराड प्रशालेत वृक्षरोपण!

प्रकाशन: 20 Aug 2023 08:47 PM
वाचन संख्या 39

मसुरे | प्रतिनिधी : ग्रामीण कृषी कार्यानुभव http://localhost/news/public/uploads/2023-24 – अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस – ओरोसच्या कृषीदूतानी वराड येथील प्रशालेत वृक्षारोपण केले. या कार्यक्रमास शिक्षक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे चेअरमन आप्पासाहेब परुळेकर आणि मुख्याध्यापिका मयेकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा असा महत्वपूर्व संदेश दिला. गावातील प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावावे असे सुचविले. कृषीदतांनी माझी माती माझा देश या अभियांनातर्गत माहिती दिली.ही झाडे कृषी विज्ञान केंद्र किलोस सिंधुदुर्ग मार्फत मोफत पुरविण्यात आली. तसेच वराडच्या सरपंच व उपसरपंच मुख्याध्यापिका शिक्षक मंडळीनी मोठे सहकार्य केले. कृषीदूत शिवम राणे, सर्वेश सावंत, अनिकेत सूर्यवंशी ,मयूर कदम ,श्रेयस पुरळकर, योगेश तेली, हॅन्ड्रियन परेरा, निधीघंटी वेंकटा साई तसेच प्राचार्य परुळेकर सर, प्रा. कोरगावकर सर यानी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस -ओरोसचे चेअरमन ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत यांच्या प्रेरणेतून यावर्षी 25000 वृक्ष लागवडीच्या संकल्पाला हातभार म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स