ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
प्रा. हरी नरके यांच्या जाण्याने बहुजन चळवळीचे अपरिमीत नुकसान झाले : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे.

प्रा. हरी नरके यांच्या जाण्याने बहुजन चळवळीचे अपरिमीत नुकसान झाले : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद तांबे.

प्रकाशन: 18 Aug 2023 10:13 AM
वाचन संख्या 128

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गने प्रा .हरी नरके यांना वाहिली आदरांजली.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्पण प्रबोधिनीच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. हरी नरके यांना आदरांजली वाहण्यात आली. दिवंगत प्रा. हरी नरके हे बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकर यांचा वैचारिक वारसा समजावून सांगणारे मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी स्तंभलेखक व समता परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख होती.त्यांच्या अकाली जाण्याने आपण एका चतुरस्त्र व परखड अभ्यासक विचारवंताला गमावून बसलो आहोत असे मत प्रा. सिध्दार्थ तांबे यांनी व्यक्त केले.

प्रा. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले होते. महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. पण त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी हा ही त्यांचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य सोबतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फोटो बायोग्राफी सुद्धा संपादित केली असल्याचे राजेश कदम यांनी सांगितले. प्रा. हरी नरके यांनी बाबासाहेब आंबेडकरांची फोटोग्राफी प्रसिद्ध केली. त्यांनी छान पुस्तके तयार केली. महात्मा फुले यांच मूळ चित्र शोधून काढले, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, हरी नरके आमचा वैचारिक पाठिंबा होता. अलीकडे आरक्षणाच्या बाबतीत ते माहिती पुरवायचे. समता चळवळीचे आघाडीचे शिलेदार, ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक श्री.हरी नरके यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली जाण्याने बहुजन चळवळीचे अपरिमीत नुकसान झाले असे अध्यक्ष आनंद तांबे म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र तांबे, सहसचिव संदेश कदम डॉ. सोमनाथ कदम, सुनील तांबे, श्रीधर तांबे, तांबे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स