ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कळसुलीत मोठा राजकीय उलटफेर...!

कळसुलीत मोठा राजकीय उलटफेर...!

प्रकाशन: 07 Oct 2021 02:04 PM
वाचन संख्या 97

आम.नितेश राणेंच्या उपस्थितीत अनेक काँग्रेस कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्ते भाजपात..!

राष्ट्रीय काँग्रेस कळसुली विभागीय अध्यक्ष प्रवीण दळवींचाही समावेश …!

कणकवली | उमेश परब – कळसुली मधील शिवसेना व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश केला. हा सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस ला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी या प्रसंगी सांगितले.

यावेळी कळसुली मधील काँग्रेस विभाग अध्यक्ष प्रवीण दळवी, संतोष दळवी, काँग्रेस बूथ सदस्य चेतन परब, काँग्रेस बूथ अध्यक्ष शैलेंद्रकुमार दळवी, हेमंत दळवी, ओंकार भावे, दिनकर लाड, विश्वनाथ लाड, श्रीनिवास गोळवणकर, प्रवीण घाडीगावकर, प्रथमेश दळवी, राजेंद्र दळवी, दिवाकर लाड, एकनाथ गुरव यांनी भाजपा चा झेंडा हाती घेतला. यावेळी नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बाबू गायकवाड, ऍड, विराज भोसले, कळसुली उपसरपंच सचिन पारधिये, शशी राणे, ऍड.समीर सावंत, संजय दळवी, दीपक मेस्त्री, राजू नार्वेकर, हेमंत वारंग, रणजीत सुतार आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स