ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सहसंपादक वैशाली पंडित यांची आज सायंकाळी ०८ वाजता लाईव्ह मुलाखत...!

आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सहसंपादक वैशाली पंडित यांची आज सायंकाळी ०८ वाजता लाईव्ह मुलाखत...!

प्रकाशन: 07 Oct 2021 11:00 AM
वाचन संख्या 85

श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो नाट्यचळवळीच्या नवरात्रोत्सवाचे औचित्य.

मुंबई | मृणाली शिंदे : श्री सोमेश्वर कलामंच निर्मित,गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे कोकणसासियांसाठी जनजागृतीचे विविध उपक्रम होत असतात. आणि आता,आपल्या माणसांनी, आपल्या माणसांसाठी सुरू केलेली ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी निर्माते अथक प्रयत्न करत आहेत.
या चळवळीचाच एक भाग म्हणजेच लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र हा उपक्रम.
आणि या उपक्रमाअंतर्गत गुरुवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१  रोजी रात्री ०८.००  वाजता नवरात्री उत्सव निमित्त वैशाली पंडित यांची विशेष मुलाखत घेतली जाणार आहे. या मुलाखतींच्या मालिकेचा हा १२६ वा भाग असेल.
आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सहसंपादक, शिक्षिका, साहित्यिक आणि आहार व आरोग्य तज्ञ मान. वैशाली पंडित यांची आजची मुलाखत मुलाखतकार कु. रिद्धी पाटील घेणार आहेत.
पुढील नऊ दिवस विविध क्षेत्रातील रणरागिणी त्यांचे विचार,माहिती व अनुभव या ‘रणरागिणी’ मुलाखत मालिकेद्वारे जनमानसांना देणार आहेत.


‘गराजलो रे गराजलो चे अधिकृत फेसबुक पेज आणि आपली सिंधुनगरी चॅनेलच्या यूट्यूबवर ही मुलाखतींची मालिका संपूर्ण नवरात्रोत्सवात लाईव्ह दाखवली जाणार आहे.’
तरी जास्तीत जास्त  माणसांनी ही मुलाखतिंची संपूर्ण मालिका मराठी व कोकणी माणसांनी पहावी,बोध घ्यावा, जागृत व्हावेआणि या चळवळीमध्ये सामिल होऊन  सहकार्य करावे असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष श्री.सहदेव धर्णे आणि गराजलो रे गराजलो नाट्य चळवळीच्या टीममार्फत करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स