ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आजपासून खुली...!

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आजपासून खुली...!

प्रकाशन: 07 Oct 2021 02:51 PM
वाचन संख्या 45

आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भाविकांना सत्तावीस ऑक्टोबपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा…..!

ब्युरो रिपोर्ट | वैभव माणगांवकर : जिल्ह्यात आज 7 ऑक्टोबर घटस्थापनेपासून 887 मंदीरांसह इतर धार्मीक स्थळे दर्शनासाठी उघडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासने नियमावली जाहीर केली आहे .जिल्हात तबल दिड वर्षा नंतर 839 मंदिर 12 चर्च आणि 36 मशीदी खुल्या होणार आहेत त्यामुळे सर्वत्र उत्सव उत्साहाचेच वातावरण आहे. धार्मीक स्थळे उघडणार असल्याने गेले दोन दिवस तेथे साफ सफाई ,रंग रंगोटीची व तत्सम कामे सुरू आहेत.
तसेच शासनानच्या नियमाने ही सर्व धार्मिक स्थळे उघडली असून या स्थानांवर एकूण क्षमतेपेक्षा 50 टक्के एवढी उपस्थिती असावी ,मास्क वापर सोशल डिस्टन्सही असेने बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही व्यक्तीने या नियमाची पालन केले नाही तर त्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम http://localhost/news/public/uploads/2005 मधील कलम 51 ते 60 भारतीय दंड संहित 1860 मधील कलम 188 असे लागू होणार आहे .कंटेनमेंट झोन नसलेल्या ठिकाणीच धार्मिक स्थळे सुरू केली आहेत. मास्क चा वापर 6 फूटांचे सुरक्षीत अंतर आणि सॅनिटायझर बंधनकारक आहे. मूर्ती व धार्मिक प्रतिकाला हात न लावता दर्शन घावे ,गर्दी टाळावी ,गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षा खालील मुलांनी शक्तोय धार्मिक जागी जाणे टाळावे. जरी कोरोना चे रुग्ण कमी झाले असले तरी संकट कायम असल्याने परवानगी देताना नियम पाळणे बंधनकारक आहे. ही परवानगी देताना आपापल्या कार्य क्षेत्र त कोरोंना स्थिती चा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनने निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपल्या कार्य श्रेत्रासाठी नियमावली जाहीर करून ही परवानगी दिली आहे. जिल्ह्यात मालवण तालुक्यातील आंगणेवाडी देवीचे मंदिर मात्र दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन मंडळातर्फे आधीच जाहीर करण्यात आलेली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स