ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगेत 'सायन्स ऑन व्हील्स'.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुणगेत 'सायन्स ऑन व्हील्स'.

प्रकाशन: 14 Aug 2023 06:01 PM
वाचन संख्या 208

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि कै वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे सायन्स सेंटरच्या वतीने ‘सायन्स ऑन व्हील’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ‘सायन्स ऑन व्हील’ या उपक्रमांतर्गत भगवती हायस्कूलमध्ये २० पेक्षा अधिक विज्ञान प्रतिकृती दाखविण्यात आल्या. तसेच त्यांची माहिती देण्यात आली. त्यासोबत विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सायन्स ऑन व्हील अर्थात फिरती विज्ञान शाळा उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांनी लक्ष वेधले होते. मुणगे सह हिंदळे, पोयरे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी या उपक्रमास भेट देऊन लाभ घेतला.

या कार्यक्रमासाठी सायन्स सेंटरचे तज्ञ मार्गदर्शक श्री शिवसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, सहायक शिक्षक एन. जी. वीरकर, प्रसाद बागवे,प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, प्रियांका कासले, एच. एस. महाले, जी. एस. तवटे, रश्मी कुमठेकर, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर, नामदेव बागवे, सायन्स सेंटरचा सहायक प्रशिक्षक वर्ग उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स