ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हिंदळे - मोर्वे शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन उपक्रम संपन्न.

हिंदळे - मोर्वे शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन उपक्रम संपन्न.

प्रकाशन: 13 Aug 2023 04:22 AM
वाचन संख्या 319

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ओळख निर्माण व्हावी, यासाठी हिंदळे – मोर्वे येथील पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पावसाळ्यात आपल्या परिसरात मिळणाऱ्या भाज्यांचा विद्यार्थी विद्यार्थिनींना परीचय व्हावा हा त्यामागील उद्देश होता. पालकांकडून या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रप्रमुख नामदेव सावळे यांच्या हस्ते फीत कापून, तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद सारंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. मुख्याध्यापक पांडुरंग नाडगौडा, शिक्षक प्रवीण सावरे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत परिसरातील रानभाज्यांची माहिती देत त्यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात व पोषण आहारात यांचा समावेश असावा, असे आवाहन केले. विविध आजारांवर मात करण्यासाठी, आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये रानभाज्यांचे महत्त्व याबाबतचे मार्गदर्शन माजी उपसरपंच कंकांद्रीत लोणे यांनी केले.

टाकळा, कुई, कारली, करटोली, कटला, शेवगा, अळू यासारख्या विविध प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. यावेळी शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रकाश तळवडकर, ग्रामपंचायत सदस्य महेश कोळंबकर, किर्ती गांवकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स