ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आता डाॅक्टर सोबत 'राडा' तथा हुज्जत घातल्यास डाॅक्टरांना उपचार नाकारायचा अधिकार ..!

आता डाॅक्टर सोबत 'राडा' तथा हुज्जत घातल्यास डाॅक्टरांना उपचार नाकारायचा अधिकार ..!

प्रकाशन: 12 Aug 2023 10:05 AM
वाचन संख्या 175

ब्यूरो न्यूज | नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार देशातील डाॅक्टर मंडळी, ‘राडा’, हुज्जत घालणार्या किंवा भांडण करणार्या रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाइकांच्या वर्तनाला अनुसरुन उपचाराला नकार देऊ शकतात. अलिकडील कालावधीत डाॅक्टर्सवर हल्ला, त्यांच्याशी हुज्जत घालण्याच्या घटना वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. डाॅक्टर आता अशा रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाइकांच्या वर्तनाबद्दल राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे रितसर तक्रार नोंदवू शकतात. आर. एम .पी. ( रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टीशनर) २०२३ च्या सुधारीत अधिसूचनेनुसार आता त्रासदायक रुग्णांना अन्यत्र रेफर करावे व आणीबाणी शिवाय अशांचे उपचार नाकारायचा अधिकार देण्यात आला आहे. केस हाती घेतल्या नंतर मात्र डाॅक्टरनी उपचार सुरूच ठेवावेत असेही या अधिसूचनेत नमूद केले आहे.

नवीन अधिसूचनेत आता डाॅक्टर्सना कोणत्याही औषध कंपनीकडून प्रवासी सेवा किंवा भेटवस्तू घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच उपचारांपूर्वीच रूग्णाचा अपेक्षीत खर्च नातेवाईक व रुग्णांना सांगणे अपरिहार्य करण्यात आले आहे. हे नवीन नियम आता ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ च्या मेडिकल एथिक्स कोड २००२ ची जागा घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स